कर्नाटक निवडणुकीत काँग्रेसचा दणदणीत विजय; ठाकरे गटाच्या नेत्याची जळजळीत टीका, म्हणाला… भाजपला

| Updated on: May 13, 2023 | 1:59 PM

कर्नाटक विधानसभेच्या 224 जागांसाठी झालेल्या या निवडणुकीत भाजप, काँग्रेस आणि जेडीएस रिंगणात उतरले होते. या रणसंग्रामात काँग्रेसने गड जिंकत काँग्रेसने 125 जागांवर आघाडी घेतली आहे.

मुंबई : कर्नाटक विधानसभेचा किंग कोण हे आज स्पष्ट झालं आहे. आतापर्यंत हाती आलेल्या निकाला नंतर राज्यात काँग्रेसच बॉस असल्याचे सिद्ध झाले. कर्नाटक विधानसभेच्या 224 जागांसाठी झालेल्या या निवडणुकीत भाजप, काँग्रेस आणि जेडीएस रिंगणात उतरले होते. या रणसंग्रामात काँग्रेसने गड जिंकत काँग्रेसने 125 जागांवर आघाडी घेतली आहे. तर भाजपा सत्ता गमावत असून पक्षाला अवघ्या 70 जागा मिळताना दिसत आहेत. जेडीएसनेही 22 जागांवर आघाडी घेतली आहे. तर इतर पक्षांना केवळ 7 जागा मिळत आहेत. यादरम्यान ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आजचा कर्नाटकचा निकाल हा देशाला एक नवी दिशा देणारा आहे. सर्व मतदारांचे अभिनंदन. जिंकून आलेल्या उमेदवारांचंही अभिनंदन. तसेच काँग्रेसचे प्रमुख मलिकार्जुन खर्गे, प्रियंका गांधी, राहुल गांधी यांचंही भास्कर जाधव यांनी अभिनंदन केलं आहे. भाजप हटाव संविधान बचाव, भाजप हटाव देश बचाव, लोकशाही बचाव, हा निकाल कर्नाटकच्या जनतेने दिला आहे. भाजपला पराभूत करायचं असेल असंच एकजूट होऊन काम करावं लागेल, असंही भास्कर जाधव यांनी म्हटलं आहे.

Published on: May 13, 2023 01:59 PM
भाजपने नाकारलेल्या उमेदवाराचा मोठा विजय!, जी. जनार्दन रेड्डी कोण?
Karnataka Election Results 2023 : कर्नाटकात भाजपला बहुमत मिळेल अन्… ‘या’ मंत्र्यानं केला मोठा दावा