Karnataka Assembly Elections : कर्नाटकात मतदारांनी भाजपला नाकारलं! काँग्रेसची सत्तेकडे वाटचाल, गाठला बहुमताचा आकडा

| Updated on: May 13, 2023 | 9:50 AM

कर्नाटक विधानसभेच्या 224 मतदारसंघांसाठी 10 मे रोजी मतदान झालं आणि आज मतमोजणी होत आहे. याचदरम्यान एक्झिट पोलनुसार काँग्रेसच्या हाती सत्ता जाण्याची शक्यता वर्तविण्यात आली होती.

बंगळुरु : कर्नाटक विधानसभा निवडणुकांचा निकाल हा काही तासांतच जाहीर होणार आहे. मतमोजणीला वेग आला आहे. अनेक ठिकाणचे निकाल हाती येत असून कोण आघाडीवर आणि कोण पिच्छाडीवर हे स्पष्ट होताना दिसत आहे. कर्नाटक विधानसभेच्या 224 मतदारसंघांसाठी 10 मे रोजी मतदान झालं आणि आज मतमोजणी होत आहे. याचदरम्यान एक्झिट पोलनुसार काँग्रेसच्या हाती सत्ता जाण्याची शक्यता वर्तविण्यात आली होती. त्यानुसार काँग्रेसच्या बाजूने निकाल येत आहेत. कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजप 84 जागा, काँग्रेस 112 जेडीएस 15 आणि इतर 2 जागांवर असल्याचे दिसत आहे. त्यामुळे काँग्रेसची सत्तेकडे वाटचाल होताना दिसत आहे. तर काँग्रेस बहुमताच्या जवळ असून फक्त 2 जागांपासून दूर आहे.

Published on: May 13, 2023 09:50 AM
अवकाळीच्या कळा आणि उष्णतेच्या झळा सोसत नांदेडचा शेतकरी काय करतोय पहा
CBSC Result | सीबीएसई दहावीचा रत्नागिरीचा निकाल 97 टक्के, कुणी पटकावला पहिला नंबर?