‘मविआतील येतीलच सोबत राष्ट्रवादीचे आमदारही तयार’; भाजपच्या मोठ्या नेत्याचा गौप्यस्फोट
महाविकास आघाडीत प्रचंड हालचाली सुरू झाल्या. तसेच राज्यात देखील असाच बदल होईल असे मविआच्या नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या. त्यावरून भाजप नेते वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी टीका केली आहे.
नागपूर : कर्नाटकमध्ये ऐतिहासिक निकाल लागला आणि काँग्रेसने एकहाती सत्ता काबीज केली. यानंतर राज्यातील राजकारण तापलं. तर महाविकास आघाडीत प्रचंड हालचाली सुरू झाल्या. तसेच राज्यात देखील असाच बदल होईल असे मविआच्या नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या. त्यावरून भाजप नेते वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी टीका केली आहे. त्यांनी, असे म्हटल्याशिवाय त्यांचे कार्यकर्ते, आमदार आणि खासदार कसे त्यांच्याकडे राहतील? ते रहावेत म्हणून त्यांना हे बोलावचं लागेल. तर महाविकास आघाडीतील बरेच आमदार आमच्याकडे यायला तयार आहे, आमच्या संपर्कात. फक्त त्यांचे सदस्यत्त्व रद्द होऊ नये म्हणून आम्ही त्या आमदारांना थांबवलं आहे असा गौप्यस्फोट त्यांनी केला आहे. निवडणूकीपूर्वी महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षाचे आमदार भाजपत येणार असल्याचेही मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे. तर राष्ट्रवादीचे आमदारंही भाजपात यायला तयार आहेत. पण आम्हीच त्यांना थांबवलं आहे. निवडणूकीच्या वेळेस ते भाजपात येतील असे स्पष्ट संकेत त्यांनी दिले आहेत.