वैभववाडी करूळ मार्गाला खड्ड्यांची दृष्ट; रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्त्यांमुळे वाहनचालकांची करत
तर मुसळधार पावसाचा अनेक ठिकाणांना फटका बसत आहे. त्याचबरोबर आता याचा फटका रस्त्यांना देखील बसताना दिसत आहे. मुसळधार पाऊस आणि पूरामुळे अनेक ठिकाणी रस्ते वाहून गेल्याचे समोर येत आहे.
सिंधुदुर्ग 23 जुलै 2023 | राज्याच्या अनेक भागांत पावसाचा जोर वाढला आहे. तर अनेक नद्या या दुथडी भरून वाहत आहेत. तर मुसळधार पावसाचा अनेक ठिकाणांना फटका बसत आहे. त्याचबरोबर आता याचा फटका रस्त्यांना देखील बसताना दिसत आहे. मुसळधार पाऊस आणि पूरामुळे अनेक ठिकाणी रस्ते वाहून गेल्याचे समोर येत आहे. कोल्हापूर जिल्ह्यात असा प्रकार दोन दिवसांपुर्वी समोर आला होता. याचदरम्यान आता कोल्हापूर जिल्ह्याच्या शेजारील जिल्ह्यात देखील पावसाळामुळे वाहणधारकांना मनस्ताप होताना समोर आलं आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात सध्या मुसळधार पावसाने हैराण केलं असून तळकोकणाला पश्चिम महाराष्ट्राशी जोडणाऱ्या वैभववाडीतील करूळ मार्गाची चाळन झाली आहे. त्यामुळे रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता असा प्रश्न वाहणधारक करत आहेत. वैभववाडीतील करूळ मार्गाला खड्ड्यांनी वेढलं असून सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर वाहतुकीसाठी या घाटाचा सर्वात जास्त वापर केला जातो. वैभववाडी पासून काही अंतर पार केल्यानंतर घाटाच्या पायथ्या पासून संपूर्ण रस्त्याची चाळन झाली आहे. त्यामुळे वाहनचालकांना कसरत करत वाहने चालवावी लागत आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात मागील 4 दिवस मुसळधार पाऊस कोसळतोय. त्यामुळे या रस्त्याला अधिकच खड्डे पडले आहेत. या खड्यात पाणी साचल्याने वाहनचालकांची दमछाक होतेय. हा मार्ग गणेशोत्सवा पूर्वी सुरळीत व्हावा अशी मागणी वाहनचाकांमधून केली जात आहे.