काहीही झालं तरी मी उपोषण करणारच; कसबा पोटनिवडणुकीतील काँग्रेस उमेदवार रवींद्र धंगेकर आंदोलनावर ठाम

| Updated on: Feb 25, 2023 | 11:12 AM

कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपकडून पैसे वाटले जात आहेत, असा गंभीर आरोप काँग्रेस उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी केला आहे. ते उपोषणहील करणार आहेत. पाहा...

पुणे : कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपकडून पैसे वाटले जात आहेत, असा गंभीर आरोप काँग्रेस उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी केला आहे. याविरोधात रवींद्र धंगेकर उपोषण करणार आहेत. कसबा गणपती मंदिरासमोर थोड्याच वेळात रवींद्र धंगेकर उपोषणाला बसणार आहेत. कसबा गणपती मंदिराजवळ मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. “मी उपोषण करणारच आहे. मी माझ्या पत्नीसह कसबा गणपती समोर उपोषणाला बसणार आहे. पोलीस दमदाटी करत आहेत. आचारसंहिता फक्त आमच्यासाठीच का? कुणी जरी अडवलं तरी न्याय मिळेपर्यंत मी उपोषण करणार आहे. भाजप पैसे वाटत आहे त्याचे पुरावेही माझ्याकडे आहेत”, असं धंगेकर म्हणालेत.

Published on: Feb 25, 2023 10:56 AM
होय मी गद्दारी केली!, फक्त ‘या’ कारणासाठी; मंत्री गुलाबराव पाटील यांचं मोठं वक्तव्य
कसबा पोटनिवडणुकीत पैसे वाटल्याचा काँग्रेसचा आरोप; धीरज देशमुख म्हणाले, आता…