कसबा पोटनिवडणूक लढवण्याबाबत मनसे लवकरच निर्णय जाहीर करणार
कसब्यात निवडणूक लढवण्यासंदर्भात रविवारी मनसे करणार आपला निर्णय जाहीर आहे. पाहा व्हीडिओ...
कसबा पोटनिवडणूक लढवण्यासंदर्भात रविवारी मनसे आपला निर्णय जाहीर करणार आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे याबाबतचा अंतिम निर्णय घेणार आहेत. येत्या रविवारी आणि सोमवारी दोन दिवस राज ठाकरे पुणे दौऱ्यावर आहेत. कसबा निवडणुकीसंदर्भात रविवारी संध्याकाळी मनसेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची राज ठाकरेंसोबत पुण्यात बैठक आहे. मनसेचे स्थानिक पदाधिकारी निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत. पण राज ठाकरेंसोबतच्या बैठकीनंतर यावर अंतिम निर्णय होईल, अशी माहिती आहे.
Published on: Feb 03, 2023 02:46 PM