आनंद दिघे यांचे कार्यालय ‘हाय जॅक’ केलं, शिंदे गटावर टीका कुणाची?
आनंद दिघे यांच्या आनंद आश्रम याचे नाव बाळासाहेबांची शिवसेना आनंद आश्रम एकनाथ शिंदे असे करण्यात आले आहे. यावरून केदार दिघे यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर टीका केली आहे.
ठाणे : ठाणे जिल्हाप्रमुख आणि शिवसेना नेते स्वर्गीय आनंद दिघे ( anand dighe ) यांचा टेभीनाका येथे असलेल्या आनंद आश्रमाचे ( anand ashram ) नाव बदलण्यात आले आहे. यावरून शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे ( kedar dighe ) यांनी शिंदे गटावर टीका केली आहे.
आनंद दिघे यांच्या आनंद आश्रम याचे नाव बाळासाहेबांची शिवसेना आनंद आश्रम एकनाथ शिंदे असे करण्यात आले आहे. यावरून केदार दिघे यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर टीका केली आहे. आनंद दिघे साहेब यांनी आपल्या कायार्लयाबाहेर कधीच अशी नेमप्लेट लावली नव्हती. सर्व पक्षाच्या कार्यकर्त्यासाठी त्यांचे कार्यालय सदैव उघडे असायचे. सर्वसामान्य माणसाला तिथे येण्याची मुभा होती. पण तिथे असे नाव फलक लावून ते कार्यालय ‘हायजॅक’ केल्यासारखे वाटतंय, अशी टीका त्यांनी केलीय.
Published on: Jan 29, 2023 08:37 AM