उद्धव-राज एकत्र येणार? चर्चांवर ठाकरे गटाचा नेता म्हणाले, “ठाकरेंशिवाय पर्याय नाही, पण…”

| Updated on: Jul 09, 2023 | 8:35 AM

उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्र यावं, अशी इच्छा दोघांच्या कार्यकर्त्यांकडून व्यक्त केली जात आहे. यासाठी अनेक ठिकाणी बॅनर्सही लावण्यात आले. याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे नेते केदार दिघे यांनी भाष्य केलं आहे.

ठाणे: राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी केलेल्या बंडानंतर आता महाराष्ट्रात ठाकरे बंधूंनी एकत्र येण्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्र यावं, अशी इच्छा दोघांच्या कार्यकर्त्यांकडून व्यक्त केली जात आहे. यासाठी अनेक ठिकाणी बॅनर्सही लावण्यात आले. याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे नेते केदार दिघे यांनी भाष्य केलं आहे. ते म्हणाले की, “ठाकरें शिवाय पर्याय नाही ही खरी गोष्ट आहे, ज्या कार्यकर्त्यांनी आपल्या नेत्यांप्रती प्रेम ठेवून, महाराष्ट्रवरती प्रेम ठेवून अशा प्रकारचे बॅनर्स लावले असतील, तरी हे मूलभूत अधिकार उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्याकडेच आहेत, या राजकारणाच्या पलीकडे जाऊन ते दोघेही ठाकरे बंधू आहेत. यांचे वैयक्तिक संबंध आहेत, यावर आमच्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यांना बोलण्याचा अधिकार नाही. दोन्हीही पक्षप्रमुख सक्षम आहेत. त्यापलीकडे त्यांची नाती आहेत, त्यामुळे योग्य तो निर्णय ते दोघेच घेऊ शकतील.”

Published on: Jul 09, 2023 08:35 AM
पंतप्रधान मोदी यांच्या भ्रष्टाचाराच्या आरोपांवर शरद पवार गरजले; म्हणाले, ‘पूर्ण सत्ता वापरा, आमचा पाठिंबा’
…एकदम ओके फेम शहाजी बापू पाटील यांचे संजय राऊतांना खुली ऑफर, म्हणाले, ‘…ते येणार?’