Malappuram boat accident : केरळमधील मलप्पुरममध्ये बोट पलटी; 21 जणांचा मृत्यू

| Updated on: May 08, 2023 | 7:32 AM

या अपघातानंतर आरोग्य मंत्री वीणा जॉर्ज यांनी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी तातडीची बैठक बोलावली आहे. मुख्यमंत्री कार्यालयाने (सीएमओ) सांगितले की, सीएम विजयन सोमवारी घटनास्थळी भेट देतील. तर सर्व सरकारी कार्यक्रम स्थगित करण्यात आले आहेत.

मलप्पुरम : केरळमधील मलप्पुरम जिल्ह्यातील तनूर भागातील थुवलाथिरम समुद्रकिनाऱ्याजवळ रविवारी संध्याकाळी एक बोट उलटली. या अपघातातील मृतांची संख्या 21 झाली आहे. बोटीत 40 जण होते असे सांगण्यात येत आहे. बचावकार्य सुरू आहे. आतापर्यंत 21 मृतदेह बाहेर काढले आहेत. तर या बोट नेमके किती लोक होते याची माहिती मिळाली नसली तरी त्यात किमान 40-50 लोक होते असे सांगण्यात येत आहे. या अपघातानंतर आरोग्य मंत्री वीणा जॉर्ज यांनी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी तातडीची बैठक बोलावली आहे. मुख्यमंत्री कार्यालयाने (सीएमओ) सांगितले की, सीएम विजयन सोमवारी घटनास्थळी भेट देतील. तर सर्व सरकारी कार्यक्रम स्थगित करण्यात आले आहेत. तसेच राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मलप्पुरम बोट दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला. केरळमधील मलप्पुरम येथे झालेल्या बोट दुर्घटनेतील लोकांचा मृत्यू अत्यंत धक्कादायक आणि दुःखदायक आहे असे म्हटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घटनेवर शोक व्यक्त करताना बोट दुर्घटनेत लोकांच्या मृत्यूने मी दु:खी आहे. शोकग्रस्त कुटुंबियांच्या सांत्वना असं म्हटलं आहे. तर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही अपघातातील लोकांच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त केला आहे. केरळमधील मलप्पुरममध्ये बोट पलटी झाल्याच्या वृत्ताने दुःखी झालो आहे. ज्यांनी आपले प्रियजन गमावले आहेत त्या सर्वांप्रती मी मनःपूर्वक शोक व्यक्त करतो. जखमींना लवकरात लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा.

Published on: May 08, 2023 07:32 AM
नाराजीनाट्यानंतर काका-पुतणे जिल्ह्यांच्या दौऱ्यावर!; नाराजी संपली? अजित पवारांवर काय बोलले शरद पवार?
Special Report | ‘कहना क्या चाहते हो?’, बारसू रिफायनरी प्रकल्पाला राज ठाकरे यांचा विरोध की पाठिंबा?