“शरद पवार भावी पंतप्रधान होण्यासाठी बिहारला गेले, मात्र….”, भाजप नेत्याचा हल्लाबोल
काही दिवसांपूर्वी बिहारच्या पाटण्यात देशातील विरोधी पक्षांची महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीत विरोधी पक्षातील प्रमुख नेत्यांनी उपस्थिती दर्शवली. यात महाराष्ट्राचे शरद पवार, उद्धव ठाकरे, सुप्रिया सुळे, आदित्य ठाकरे आदी नेत्यांचा समावेश होता. यावरून आता भाजप नेते केशव उपाध्ये यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली आहे.
कोल्हापूर: काही दिवसांपूर्वी बिहारच्या पाटण्यात देशातील विरोधी पक्षांची महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीत विरोधी पक्षातील प्रमुख नेत्यांनी उपस्थिती दर्शवली. यात महाराष्ट्राचे शरद पवार, उद्धव ठाकरे, सुप्रिया सुळे, आदित्य ठाकरे आदी नेत्यांचा समावेश होता. यावरून आता भाजप नेते केशव उपाध्ये यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली आहे. “मणिपूरचा विषय अचानक सुरु झालेला नाही. मला पवार साहेबांचं कौतुक वाटलं. भावी पंतप्रधान होण्यासाठी ते बिहारला गेले मात्र मणिपूरच्या प्रश्नासाठीच्या सर्व पक्षीय बैठकीला ते गेले नाही. एकत्र येणारे सगळे विरोधी पक्ष म्हणजे प्रायव्हेट पार्टी आहे,” असं केशव उपाध्ये म्हणाले.
Published on: Jun 27, 2023 04:11 PM