“शरद पवार यांच्या डबलगेमवर उद्धव ठाकरे यांची भूमिका काय?”, भाजप नेत्याचा सवाल

| Updated on: Jun 30, 2023 | 3:44 PM

पहाटेच्या शपथविधीवरून राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात दावे-प्रतिदावे सुरु आहेत. यावर भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी उद्धव ठाकरे यांना आपली भूमिका स्पष्ट करण्यास सांगितली आहे.

मुंबई: पहाटेच्या शपथविधीवरून राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात दावे-प्रतिदावे सुरु आहेत. शरद पवार यांनी डबलगेम केल्याचा आरोप फडणवीस यांनी केला होता. त्यानंतर शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेत आपण टाकलेल्या गुगलीवर देवेंद्र फडणवीस यांची विकेट पडली, असं म्हणाले. यावर आता भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “मी गुगली टाकली, हे शरद पवार यांचं वाक्य म्हणजे त्यांनी खेळी केली यावर स्वतःच शिक्कोमोर्तब केला आहे. देवेंद्रजींनी शरद पवार यांनी ‘डबलगेम’ खेळल्याचा जो दावा केला, तो दावा तंतोतंत खरा ठरला आहे. याचाच अर्थ देवेंद्र फडणवीस खोटं बोलत नव्हते, हे सिद्ध झालं आहे. आता आमचा सवाल उद्धव ठाकरेंना आहे.पवारांनी डबल गेम खेळल्याचं मान्य केलंय, उद्धव ठाकरे आता या डबल गेमवर तुमची भूमिका काय? उद्धव ठाकरे यांना फसवून शरद पवार यांनी डबल गेम खेळला आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंची भूमिका काय? शरद पवार यांच्या डबलगेमचा अनुभव वसंतदादा पाटील आणि सोनिया गांधी यांनी घेतलेला आहे,” असं उपाध्ये म्हणाले.

Published on: Jun 30, 2023 03:44 PM
ठाकरे गटाच्या मोर्चावर संजय शिरसाट यांची टीका; म्हणाले, “आदित्य ठाकरे कायद्यापेक्षा मोठे नाही, भ्रष्टाचार…”
अखेर मुहुर्त ठरला! ‘या’ दिवशी होणार राज्याचा मंत्रिमंडळ विस्तार, देवेंद्र फडणवीस यांनी केलं जाहीर…