“सत्तेसाठी उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्त्व सोडून,काँग्रेसची पालखी उचलली”, भाजपचं टीकास्त्र
भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी ठाकरे गटावर सडकून टीका केली आहे. "ढवळ्या शेजारी बांधला पवळ्या वाण नाही पण गुण लागला , ही सध्याच्या शिल्लक सेनेची स्थिती आहे.संधीसाधू राजकारणाचा काँग्रेसचा गुण शिल्लक सेनेच्या नसानसात भरलेला दिसतो आहे.
मुंबई : भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी ठाकरे गटावर सडकून टीका केली आहे. “ढवळ्या शेजारी बांधला पवळ्या वाण नाही पण गुण लागला , ही सध्याच्या शिल्लक सेनेची स्थिती आहे.संधीसाधू राजकारणाचा काँग्रेसचा गुण शिल्लक सेनेच्या नसानसात भरलेला दिसतो आहे. संजय राऊत यांना काँग्रेसची झिंग चढल्याने त्यांना आठवण करुन देऊ इच्छितो, द्रौपदी मुर्मू यांना राष्ट्रपती भाजपाने केले, एनडीएने केले. केवळ स्वतःच्या अहंकारापाई उद्धव यांनी वंदनीय बाळासाहेब आणि हिंदुत्ववादी विचारांना तिलांजली वाहिली”, असं केशव उपाध्ये म्हणाले. “लोकशाहीची शोभा वाढविण्याची भाषा शिल्लक सेना करते आहे. 2019 ला महाराष्ट्राने कल देवेंद्रजींच्या नेतृत्वाला दिला होता, हे जगजाहीर आहे. तेव्हा लोकशाहीची हत्या केली आणि आता शोभा वाढवण्याच्या बाता करता?”, असा सवाल देखील केशव उपाध्ये यांनी केला.
Published on: May 26, 2023 03:05 PM