Video : केतकी चितळेला चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी

| Updated on: May 18, 2022 | 5:38 PM

अभिनेत्री केतकी चितळेला (Ketaki Chitale) आजच ठाणे कोर्टाने चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्याबाबत आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी केतकी चितळेच्या अडचणीत वाढ झाली आहे. केतकी चितळेविरोधात अनेक ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तिला ताब्यात घेण्यासाठी आता गोरेगाव पोलीस आणि पुणे पोलिसांकडून प्रयत्न सुरू आहेत. सुरूवातील केतकी चितळेला नवी मुंबईतील […]

अभिनेत्री केतकी चितळेला (Ketaki Chitale) आजच ठाणे कोर्टाने चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्याबाबत आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी केतकी चितळेच्या अडचणीत वाढ झाली आहे. केतकी चितळेविरोधात अनेक ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तिला ताब्यात घेण्यासाठी आता गोरेगाव पोलीस आणि पुणे पोलिसांकडून प्रयत्न सुरू आहेत. सुरूवातील केतकी चितळेला नवी मुंबईतील कळंबोली पोलिसांनी (Navi Mumbai Police) ताब्यात घेतलं. त्यानंतर तो गुन्हा हा गुन्हे शाखेकडे वर्ग करून तिला ठाणे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं. नवी मुंबई पोलिसांच्या ताब्यातून ठाण्यात घेऊन जाताना केतकी चितळेला बाहेर काढण्यात आलं. यावेळी केतकी चितळेवर अंडी फेकण्या आली. शाई फेकण्यात आली. तिच्यावर हल्लाही झाला. मात्र तरीही केतकी चितळे ही स्माईल करताना दिसून आली. पोलिसांनी मोठ्या गडबडीने तिला उचलून गाडीत घेडतलं. मात्र गाडीतही केतकी हसतानाच दिसून आली.

Published on: May 18, 2022 05:38 PM
Video : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राजीनामा द्या- चंद्रकांत पाटील
Video : भिती वाटत असेल राज ठाकरेंनी आदित्य ठाकरेंचा हात पकडून अयोध्येत जावं- दिपाली सय्यद