पुणेकरांसाठी खूश खबर! पावसाने जोर कायम, खडकवासला धरण 100 टक्के भरण्याच्या मार्गावर
धरणक्षेत्रात देखील चांगला पाऊस होत असल्याने पुणेकरांसाठी खूश खबर आहे. पुण्यातील खडकवासला धरण 91 टक्के भरलं असून या धरणातून पाणी सोडायला सुरुवात झाली आहे. सध्या धरणातून 2 हजार 568 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे.
पुणे, 26 जुलै 2023 | गेल्या पंधरादिवसांपासून पुणे जिल्ह्यात पावसाची बॅटिंग होताना दिसत आहे. अशातच पुण्याच्या घाटमाथ्यावर देखील पाऊस जारदार होत आहे. धरणक्षेत्रात देखील चांगला पाऊस होत असल्याने पुणेकरांसाठी खूश खबर आहे. पुण्यातील खडकवासला धरण 91 टक्के भरलं असून या धरणातून पाणी सोडायला सुरुवात झाली आहे. सध्या धरणातून 2 हजार 568 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. याच्या आधी धरणातून 421 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू होता. मात्र आता धरणक्षेत्रात पडणाऱ्या मुसधार पावसामुळे धरण 100 टक्के भरण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे धरणातून पाण्याचा विसर्ग केला जात आहे. दरम्यान, मुठा नदीलगत राहणाऱ्या नागरिकांना योग्य ती खबरदारी व दक्षता घेण्याचे आवाहन खडकवासला पाटबंधारे विभागाने केले आहे.
Published on: Jul 26, 2023 10:48 AM