Eknath Khadse | खडसे कुटुंबियांनी साजरा केला बैलपोळा सण, पुरणपोळीची नैवैद्यही भरवला
Eknath Khadse | भारतीय सण उत्सवात कृषी संस्कृतीशी कृतद्यता व्यक्त करणारे अनेक सण आहे, त्यातील मानाचा सण म्हणजे बैलपोळा. जळगाव जिल्ह्यात खडसे कुटुंबियांनीही हा सण साजरा केला.
Eknath Khadse | भारतीय सण उत्सवात कृषी संस्कृतीशी (Agriculture Festival) कृतद्यता व्यक्त करणारे अनेक सण आहे, त्यातील मानाचा सण म्हणजे बैलपोळा. जळगाव जिल्ह्यात राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) कुटुंबियांनीही हा सण साजरा केला. माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी सहकुटुंब पारंपरारिक पद्धतीने बैलपोळ्याचा सण (Bail Pola Festival) साजरा केला. वर्षभर शेतात राबराबणाऱ्या आणि धन्याला साथ देणाऱ्या बैलांप्रति कृतद्यता व्यक्त करण्यासाठी बैलपोळा साजरा करण्यात येतो. कृषीदेवतेत वृषभाला मानाचा स्थान आहे. खडसे यांनी सहकुटुंब बैलपोळा साजरा केला. त्यांनी परंपरागत रित्या सजलेल्या बैलाना पुरणपोळीचा नैवैद्यही भरवला. त्यांनी बैलांची पूजा ही केली. त्यांना कुंकू लावले आणि त्यांची आरती ओवळली. ग्रामीण भागात बैल पोळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. बैलांकडून कुठलेही काम करुन घेण्यात येत नाही. त्यांना नदीवर आंघोळ घालण्यात येते. त्यानंतर सजवण्यात येते. संध्याकाळी गावात बैलांचा पोळा फुटता आणि घरोघरी बैलांची पूजा करण्यात येते. त्यांना नैवैद्य भरवण्यात येतो.