हा माझ्या आयुष्यातील भाग्याचा क्षण; महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान झाल्यावर आप्पासाहेब धर्माधिकारी यांचं वक्तव्य

| Updated on: Apr 16, 2023 | 2:01 PM

Appasaheb Dharmadhikari on Maharashtra Bhushan Award 2022 : महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान झाल्यावर आप्पासाहेब धर्माधिकारी यांची पहिली प्रतिक्रिया; पाहा संपूर्ण भाषण...

खारघर : डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना आज महाराष्ट्र भूषण पुरस्कार (Dr Appasaheb Dharmadhikari Maharashtra Bhushan Award 2022) प्रदान करण्यात आला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमात आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी आपले विचार मांडले, “माझ्या आयुष्यातील हा भाग्याचा क्षण आहे. पुरस्कार हा नेहमीच मोठा असतो. तो लहान कधीच नसतो”, असं आप्पासाहेब धर्माधिकारी म्हणाले आहेत. हा पुरस्कार माझ्या कार्याचा गौरव आहे. नानासाहेबांनी कष्ट केले. तुम्ही साथ दिली. त्यामुळे या पुरस्काराचं श्रेय तुम्हाला जातं, असंही ते म्हणालेत. आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत मानवता सेवेचं काम करत राहणार, असंही त्यांनी म्हटलं आहे.

Published on: Apr 16, 2023 02:00 PM
ठाकरे-पवार भेटीत नेमकं काय घडलं? संजय राऊतांचा ‘रोखठोक’मधून मोठा गौप्यस्फोट
वज्रमूठ सभेच्या ठिकाणी चोख पोलीस बंदोबस्त, बघा कशी आहे सुरक्षा?