खारपाणपट्ट्यातील पाणी पुरवठा योजनाच फडणवीसांनी रद्द केली; राऊत यांचा सरकारवर घणाघात

| Updated on: Apr 20, 2023 | 11:35 AM

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सरकारवर टीकास्र सोडलं आहे. त्यांनी या सरकारने खारघर येथे श्रीसेवक पाण्याशिवाय तडफडून मारले. आता विदर्भात पाणी आक्रोश केल्याने अटका केल्याचे म्हटलं आहे.

मुंबई : खारपाणपट्ट्यातील 69 खेडी पाणीपुरवठा योजनेची मान्यता शिंदे-फडणवीस सरकारने रद्द केल्याच्या पार्श्वभूमीवर बाळापूरचे आमदार नितीन देशमुख आक्रमक झाले. त्यांनी अकोला ते नागपूर पायी ‘संघर्ष यात्रा’ काढली. मात्र ते पोहचायच्या आतच पोलिसींनी बळाचा वापर करत त्यांना आणि त्यांच्या समर्थकांना अटक केली. त्यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सरकारवर टीकास्र सोडलं आहे. त्यांनी या सरकारने खारघर येथे श्रीसेवक पाण्याशिवाय तडफडून मारले. आता विदर्भात पाणी आक्रोश केल्याने अटका केल्याचे म्हटलं आहे. तर नितीन देशमुख यांनी काढलेल्या संघर्ष यात्राची सरकारला अडचन का सवाल देखील त्यांनी उपस्थित केला आहे. आमचे आमदार नितीन देशमुख आणि त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांवर देवेंद्र फडणवीस यांच्या पोलिसांनी जवळजवळ हल्ला करून त्यांना अज्ञातस्थळी नेल्याचा आरोप केला आहे.

Published on: Apr 20, 2023 11:00 AM
ठाण्यातील बिझनेस पार्कमधील आगीची होणार चौकशी
महाराष्ट्र भूषण कार्यक्रमातील मृतांचा आकडा सरकार लपवतंय; संजय राऊत आक्रमक