उद्धव ठाकरेंच्या टीकेला मिळणार उत्तर; शिंदेंच्या सभेसाठी मैदानात जय्यत तयारी
शिंदे यांची सभा 19 तारखेला होणार आहे. यासाठी सभेसाठी गोळीबार मैदानामध्ये जय्यत तयारी करण्यात आलेली आहे
रत्नागिरी : खेडमधील गोळीबार मैदानात उद्धव ठाकरे यांची सभा झाली होती. यासभेत त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह त्यांच्याबरोबर गेलेल्या आमदारांवर आणि नेत्यांवर टीका केली होती. त्यांच्या त्या टीकेला उत्तर देण्यासाठी यापेक्षा मोठी सभा शिंदे यांच्या उपस्थितीत घेऊ असे रामदास कदम यांनी म्हटलं होतं. त्याप्रमाणे शिंदे यांची सभा 19 तारखेला होणार आहे. यासाठी सभेसाठी गोळीबार मैदानामध्ये जय्यत तयारी करण्यात आलेली आहे. गोळीबार मैदानामध्ये एकनाथ शिंदे यांच्या सभेला मोठ्या प्रमाणामध्ये कार्यकर्ते येऊ शकतात. त्यामुळे ही सगळी तयारी करण्यात आली आहे. 19 तारखेला ही सभा होणार असून मैदान तयार आहे. तर या सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नेमकं काय बोलणार याकडे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.
Published on: Mar 18, 2023 09:37 AM