काँग्रेस सांभाळण्याची खिंड सोडून कोण पळाले ? थोरात यांनी ‘या’ नेत्याचे घेतले नाव
राधाकृष्ण विखे पाटील यांनी कॉंग्रेस नेते बाळासाहेब थोरात हे खिंड न लढताच पळून गेले होते अशी टीका केली होती. त्यावर बाळासाहेब थोरात यांनी पलटवार केलाय.
संगमनेर : नाशिक विधानपरिषद निवडणुकीवरून अहमदनगर जिल्ह्यत सुरु झालेलं राजकारण संपता संपत नाहीय. भाजपचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी कॉंग्रेस नेते बाळासाहेब थोरात हे खिंड न लढताच पळून गेले होते अशी टीका केली होती. त्यावर बाळासाहेब थोरात यांनी पलटवार केलाय. खिंड तर माझ्याकडे नंतर आली. पहिले पळाले हे. नंतर मी खिंड लढवली. २०१९ साली पहिले पळाले ते. ते विरोधी पक्षनेते होते. महाराष्ट्रातली काँग्रेस सांभाळण्याची जबाबदारी त्यांच्यावर होती. त्यांनी ती सांभाळली नाही. पण, वेळ आली तेव्हा ते पळून गेले. अशी टीका थोरात यांनी राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर केलीय.
Published on: Feb 14, 2023 08:51 AM