मुंबईतून पुण्याकडे प्रवास करणार असाल तर बातमी आवश्य वाचा; अन्यथा ट्रॅफिकमध्ये फसाल
Old Pune Mumbai Highway Traffic jam : जुन्या पुणे मुंबई महामार्गावर खंडाळा बोरघाटामध्ये वाहतूक कोंडी झाली आहे. त्यामुळे मुंबईतून पुण्याकडे प्रवास करणार असाल तर ट्रॅफिकचा सामना करावा लागू शकतो. पाहा व्हीडिओ...
बोरघाट,खोपोली : जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर वाहतूक कोंडी झाली आहे. जुन्या पुणे मुंबई महामार्गावर खंडाळा बोरघाटामध्ये वाहतूक कोंडी झाली आहे. वाहतूक कोंडी फोडण्यासाठी पोलिसांकडून 10-10 मिनिटांचे ब्लॉक करण्यात येत आहेत. पुणे मुंबई एक्सप्रेस हायवेनंतर आता जुना पुणे मुंबई महामार्गवर देखील ट्रॅफिक जाम झालं आहे. सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे अनेक जण बाहेरगावी निघाल्याने वाहनांच्या संख्येत वाढ झाली असल्याने मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक जॅम झालं आहे. वाहतूक कोंडी फोडण्यासाठी महामार्ग पोलिसांकडून 10-10 मिनिटांचे ब्लॉक घेऊन गाड्या विरुद्ध दिशेने सोडून ट्रॅफिक सोडविण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे तुम्हीही मुंबईकडून पुण्याकडे प्रवास करणार असाल तर तुम्हाला ट्रॅफिकचा सामना करायला लागू शकतो.
Published on: Apr 30, 2023 10:27 AM