“सुरक्षा मिळवण्यासाठी संजय राऊत यांचा स्टंट”, धमकी प्रकरणावरून शिवसेनेत्या नेत्याची टीका
काही दिवसांपूर्वी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि त्यांचे बंधू सुनील राऊत यांनाही जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. या धमकी प्रकरणात मयूर शिंदे नावाच्या आरोपीला अटक करण्यात आली आहे. हा मयूर शिंदे संजय राऊत यांचे बंधु सुनील राऊत यांचा निकटवर्तीय असल्याची चर्चा आहे. यावर शिवसेनेचे नेते किरण पावसकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
मुंबई : काही दिवसांपूर्वी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि त्यांचे बंधू सुनील राऊत यांनाही जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. या धमकी प्रकरणात मयूर शिंदे नावाच्या आरोपीला अटक करण्यात आली आहे. हा मयूर शिंदे संजय राऊत यांचे बंधु सुनील राऊत यांचा निकटवर्तीय असल्याची चर्चा आहे. यावर शिवसेनेचे नेते किरण पावसकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “मुंबई पोलिसांना आणि राज्य सरकारला विनंती आहे की संजय राऊत यांना आलेली धमकी प्रकरणची सखोल चौकशी करावी. राऊत बंधू खोटं बोलत आहेत.राऊत बंधू यांनी त्यांना धमकी देण्यासाठी कोणा कोणाला धमकी देण्याची सुपारी दिली आहे त्याची चौकशी करावी.स्वतःची नेतागिरी चमकविण्यासाठी तुम्ही गरिबांच्या मुलाचा वापर करता. सुरक्षा मिळविण्यासाठी हे संजय राऊत यांचा स्टंट आहे. त्यांची सुरक्षा काढून घेतली पाहिजे. संजय राऊत यांना धोका नाही तर त्यांच्याकडून असंख्य लोकांना धोका आहे”, असं पावसकर म्हणाले.