कोल्हापूर राडा ते उद्धव ठाकरे यांचा लंडन दौरा, शिवसेनेच्या नेत्याचा गंभीर आरोप

| Updated on: Jun 08, 2023 | 10:38 AM

एका आक्षेपार्ह स्टेटसमुळे बुधवारी कोल्हापुरात तनावपूर्वक वातावरण निर्माण झालं होतं. कोल्हापुरातील राड्यामुळे राज्यातील राजकारणात खळबळ माजली आहे. दरम्यान शिवसेना नेते किरण पावसकर यांनी या राड्यावरून उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

मुंबई : एका आक्षेपार्ह स्टेटसमुळे बुधवारी कोल्हापुरात तनावपूर्वक वातावरण निर्माण झालं होतं. कोल्हापुरातील राड्यामुळे राज्यातील राजकारणात खळबळ माजली आहे. दरम्यान शिवसेना नेते किरण पावसकर यांनी या राड्यावरून उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. “काही दिवसांपूर्वी मी एक व्हिडीओ पाहिला, उबाठाचे पक्षप्रमुख यांनी एक भूमिका मांडली. ते म्हणाले की, औरंगजेब हे देशप्रेमी होते. मातृभूमीसाठी ते लढले होते”, “एकीकडे शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार घालतात आणि औरंगजेब यांचा उल्लेख करत असता.याचा संदर्भ घेत काही लोकांनी औरंगजेबांचे फोटो ठेवले. उबाठाचे पक्षप्रमुख तरुणांच्या मनात संभ्रम निर्माण करत आहेत. त्यामुळे उबाठाच्या पक्षप्रमुखांवर कारवाई करणार का? उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी 6 महिन्या पूर्वी सांगितले होते की दंगली होऊ शकतात, हे त्यांना आधीच कसे कळाले? याची चौकशी झाली पाहिजे. या दंगल घडत नाही आहेत, तर उद्धव ठाकरे आणि संजय राऊत हे दंगली घडवून आणत आहेत”, असा आरोप किरण पावसकर यांनी केला.

Published on: Jun 08, 2023 10:38 AM
“कोण शरद पवार? मी ओळखत नाही”, भाजपच्या ‘या’ केंद्रीय मंत्र्याची टीका
“…अशी कामं शरद पवार नेहमी करतात”, मुस्लिम, ख्रिश्चन वक्तव्यावर राधाकृष्ण विखे पाटील यांची टीका