Vishwanath Mahadeshwar यांच्यासह शिवसेनेच्या 3 माजी नगरसेवकांनाही अटक

| Updated on: Apr 25, 2022 | 5:52 PM

किरीट सोमय्या यांनी या हल्ल्याप्रकरणी वांद्रे पोलिसांत तक्रार दाखल केली होती. त्यानंतर वांद्रे पोलिसांनी हा गुन्हा खार पोलिसांकडे वर्ग केला होता. त्यानंतर खार पोलिसांनी तपासानंतर ही कारवाई केल्याचे समजते आहे.

मुंबई : मुंबईचे माजी महापौर आणि शिवसेना नेते विश्वनाथ महाडेश्वर (Vishwanath Mahadeshwar) यांना अटक झाली आहे. भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांच्यावर हल्ला झाला होता त्याप्रकरणी महाडेश्वर यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. खासदार नवनीत राणा (Navneet Rana) आणि आमदार रवी राणा यांना भेटायला किरीट सोमय्या गेले असता त्यांच्या गाडीवर हल्ला झाला होता. यात किरीट सोमय्या जखमी झाल्याचीही माहिती समोर आली होती. त्यानंतर खार पोलिसांनी या प्रकरणाच्या तपासाला वेग आणला होता. यावेळी किरीट सोमय्या यांनी शिवसैनिकांच्या अंगावर गाडी चढवण्याचा प्रयत्न केला असल्याची तक्रारही महाडेश्वर यांच्याकडून करण्यात आली होती. मात्र महाडेश्वर यांची चौकशी झाल्यानंतर त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून खार पोलिसांनी विश्वनाथ महाडेश्वर यांना अटक केली आहे.

Published on: Apr 25, 2022 05:52 PM
Dombivli Crime : डोंबिवलीत किरकोळ कारणावरून युवकाला मारहाण, सीसीटीव्ही बघाल तर थक्क व्हाल
Devendra Fadnavis : मविआच्या ठोकशाहीला ठोकशाहीनंच उत्तर देणार