ठाकरेंच्या माफिया सरकारची उलटी गिनती सुरू, सोमय्यांचा पुन्हा एकदा महाविकास आघाडीवर निशाणा

| Updated on: Jun 11, 2022 | 10:07 AM

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी राज्य सभेच्या निकालावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडी सरकारला टोला लगावला आहे. ठाकरेंच्या माफिया सरकारची उलटी गिनती सुरू झाल्याचे त्यांनी म्हटले आहे.

राज्यसभा निवडणुकीचा निकाला लागला आहे. या निवडणुकीत धनंजय महाडिक हे विजयी झाले आहेत. तर शिवसेनेचे उमेदवार संजय पवार यांचा पराभव झाला आहे. या निकालावरून आता भाजप नेते किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे. ठाकरेंच्या माफिया सरकारची उलटी गिनती सुरू झाल्याचे किरीट सोमय्या  यांनी म्हटले आहे. दरम्यान या निवडणुकीवरून आता आरोप -प्रत्यारोपाचे राजकारण रंगण्याची शक्यता आहे.

Published on: Jun 11, 2022 10:07 AM
यंत्रणाचा गैरवापर करून विजय मिळवला; महाडिकांच्या विजयानंतर संजय राऊतांची भाजपावर टीका
Sharad Pawar : फडणवीसांना माणसं आपलीशी करण्यात यश, शरद पवारांचा टोला