ED raid : सूरज चव्हाण यांच्या घरी ईडीने धाड; किरीट सोमय्या म्हणतात…
राज्यात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. तर याच प्रकरणात मुंबईतील 15 ठिकाणी छापेमारी करण्यात आली. लाइफलाइन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्व्हिसेस कंपनीच्या माध्यमातून पाटकर आणि त्यांच्या तीन साथीदारांनी कोरोना काळात कोविड सेंटर्समध्ये घोटाळा केल्याचा संशय आहे.
मुंबई : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचे निकटवर्तीय मानले जाणारे उद्योजक सुजित पाटकर यांच्या घरावर आज ईडीने छापेमारी केली. त्यामुळे राज्यात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. तर याच प्रकरणात मुंबईतील 15 ठिकाणी छापेमारी करण्यात आली. लाइफलाइन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्व्हिसेस कंपनीच्या माध्यमातून पाटकर आणि त्यांच्या तीन साथीदारांनी कोरोना काळात कोविड सेंटर्समध्ये घोटाळा केल्याचा संशय आहे. त्याविरोधात ईडीकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याच मनी लॉन्ड्रींग प्रकरणी आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय मानल्या जाणाऱ्या सूरज चव्हाण यांच्यावर देखील ईडीने धाड टाकली. त्यांच्या घरावर सर्च ऑपरेशन सुरू असल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. सुरज चव्हाण हे युवा सेनेचे कार्यकारणी सदस्य आहेत. त्यावरून भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आपली पहिली प्रतिक्रिया देताना, आज सुजित पाटकर आणि त्यांच्या साथिदारांवर ईडीने छापेमारी केल्याचं वृत्तवाहिन्यावरून कळाले. त्यामुळे हिशोबतर द्यावाच लागणार असे ते म्हणालेत.