खेडवरुन Kirit Somaiya दापोलीकडे रवाना

| Updated on: Mar 26, 2022 | 4:46 PM

गेल्या काही दिवसांपासून भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) महाविकास आघाडीवर रोज तुटून पडत आहे. कधी संजय राऊत, कधी नवाब मलिक, कधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Cm Uddhav Thackeray) आणि आज अनिल परब(Anil Parab), किरीट सोमय्यांची आरोपांची मालिका संपत नाहीये.

गेल्या काही दिवसांपासून भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) महाविकास आघाडीवर रोज तुटून पडत आहे. कधी संजय राऊत, कधी नवाब मलिक, कधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Cm Uddhav Thackeray) आणि आज अनिल परब(Anil Parab), किरीट सोमय्यांची आरोपांची मालिका संपत नाहीये. आता दापोलीतल्या एक रिसॉर्टवरून किरीट सोमय्या आक्रमक झाले आहेत. हे रिसॉर्ट बेकायदेशीर आहे आणि शिवसेना नेते अनिल परबांच्या मालकिचे आहे, असा आरोप किरीट सोमय्या सतत करत आहेत. त्यात रिसॉर्टची पाहणी करण्यासाठी सोमय्या कोकणात गेले आहेत. मात्र आधी सोमय्यांना राष्ट्रवादीचे नेते संजय कदम यांनी कडकडीत इशारा दिला होता. किरीट सोमय्यांनी येऊनच दाखवावं, हे कोकण आहे, गुजरात नाही, आम्ही त्यांना अडवणार आहे. किरीट सोमय्यांच्या येण्याने पर्यटनावर परिणाम होईल असा आरोप राष्ट्रवादीने केला आहे.

Published on: Mar 26, 2022 04:46 PM
Devendra Fadnavis | मुख्यमंत्र्यांनी भ्रष्टाचाराचं उत्तर दिलं पाहिजे
देवेंद्र फडणवीस दिल्लीत जातील तेव्हा गिरीश महाजनांना मुख्यमंत्रीपद मिळेल- एकनाथ खडसे