नील सोमय्यांवर खुन्नस का काढतायेत – किरीट सोमय्या
किरीट सोमय्या यांनी आज पत्रकार परिषद घेत रश्मी ठाकरे यांच्या बंगल्यांच्या मुद्यावरुन आणि रश्मी ठाकरे यांचे बंधू पाटणकर यांनी कर्जतमध्ये घेतलेल्या जमिनीसंदर्भात उत्तर देत पुन्हा प्रश्नचिन्ह उभं केलं आहे.
नवी दिल्ली: शिवेसना (Shivsena) खासदार संजय राऊत यांनी काल पत्रकार परिषद घेत भाजपवर टीका केली होती. भाजप नेते देवेंद्र फडणवीस, माजी खासदार किरीट सोमय्या, निल सोमय्या (Neel somaiya), मोहित कंबोज यांच्यावर टीका केली होती. संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत पीएमसी बँक घोटाळ्यातील प्रमुख आरोपी वाधवान याच्याशी निल सोमय्या याचा संबंध असल्याचा आरोप केला होता. संजय राऊत यांच्या स्फोटक पत्रकार परिषदेनंतर आज नवी दिल्लीत किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषद घेतली. किरीट सोमय्या यांनी आज पत्रकार परिषद घेत रश्मी ठाकरे यांच्या बंगल्यांच्या मुद्यावरुन आणि रश्मी ठाकरे यांचे बंधू पाटणकर यांनी कर्जतमध्ये घेतलेल्या जमिनीसंदर्भात उत्तर देत पुन्हा प्रश्नचिन्ह उभं केलं आहे. यावेळी नील सोमय्यांवर खुन्नस का काढतायेत असा सवाल देखील त्यांनी केला.
Published on: Feb 16, 2022 10:43 AM