किरीट सोमय्या यांनी दिला थेट ठाकरे, किशोरी पेडणेकर यांना इशारा, म्हणाले, कारवाई करणार

| Updated on: Jan 06, 2023 | 3:48 PM

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ठाकरे गटाच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. याच बरोबर त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर देखिल हल्ला चढवला आणि पेडणेकर यांनी केलेल्या घोटाळ्यात ठाकरेंचाही हात असल्याचे म्हटलं.

मुंबई : भाजप नेते किरीट सोमय्या आता पुन्हा एकदा ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्याविरोधात आक्रमक झाले आहेत. तसेच यावेळी त्यांनी, माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी कोणता आणि कसा घोटाळा केला? तो उद्धव ठाकरे यांच्या सांगण्यावरूनच कसा झाला हे सांगितलं आहे. त्याचबरोबर याप्रकरणी त्यांनी आज पत्रकार परिषद घेत थेट पुरावेच दाखवले.

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ठाकरे गटाच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. याच बरोबर त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर देखिल हल्ला चढवला आणि पेडणेकर यांनी केलेल्या घोटाळ्यात ठाकरेंचाही हात असल्याचे म्हटलं.

किशोरी पेडणेकर यांनी संजय महादेव अंधारी यांच्या बोगस सह्या करून फसवणूक केली. तर उद्धव ठाकरे यांच्या सांगण्यावरूनच हा घोटाळा झाला असेही सोमय्या यांनी म्हटलं आहे. या घोटाळ्या प्रकरणी न्यायालयाने कंपनी अॅक्ट नुसार 2013 च्या अंतर्गत गुन्हा दाखल करून घेतल्याचेही त्यांनी सांगितलं आहे.

Published on: Jan 06, 2023 03:48 PM
चंद्रशेखर बावनकुळे हास्यास्पद विधानं करतात : छगन भुजबळ
नवाब मलिकांना दिलासा नाहीच; तुरूंगातला मुक्कामही 14 दिवसांनी वाढला