अहमदनगरच्या लव्ह जिहाद प्रकरणात भाजपच्या मोठ्या नेत्याची उडी; घेणार आज पीडित कुटुंबाची भेट
पोलिसांच्या आश्वासनानंतर हे उपोषण त्यांनी मागे घेतले असले तरी पोलिसांवर विश्वास नसल्याचा त्यांचा तिच्या कुटुंबीयांनी आरोप होता. दरम्यान, या घटनेचे राजकीय पडसाद उमटले असून या कुटुंबियांच्या भेटीसाठी भाजप नेते किरीट सोमय्या कर्जत येथे दाखल झाले आहेत.
अहमदनगर : कर्जत तालुक्यात राहणाऱ्या एका कुटुंबातील अल्पवयीन मुलीचे लव्ह जिहादसाठी अपहरण झाल्याचा आरोप करत तिच्या कुटुंबीयांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण केले आहे. पोलिसांच्या आश्वासनानंतर हे उपोषण त्यांनी मागे घेतले असले तरी पोलिसांवर विश्वास नसल्याचा त्यांचा तिच्या कुटुंबीयांनी आरोप होता. दरम्यान, या घटनेचे राजकीय पडसाद उमटले असून या कुटुंबियांच्या भेटीसाठी भाजप नेते किरीट सोमय्या कर्जत येथे दाखल झाले आहेत. राज्यात लव्ह जिहादचे प्रकरण वाढत चालले आहे. राज्यात कायद्यात बदल किंवा जे कायदे आहेत ते सक्षमपणे राबवण्यात कसे येतील यावर विचार करण्याची गरज असल्याच मत किरीट सोमय्या यांनी व्यक्त केलं आहे. तर हे प्रकार अडीच ते तीन वर्षापासून वाढत चालले आहे. त्यामुळे ही समाजासाठी अतिशय चिंताजनक बाब असल्याचेही सोमय्या यांनी म्हटलं आहे. किरीट सोमय्या आज अहमदनगर दौऱ्यावर असून ते या पीडित कुटुंबाची ते भेट घेणार आहेत. त्यानंतर अहमदनगरचे पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्यासोबत चर्चा करणार आहे.