सरकार सकारात्मक प्रयत्न करतय, संप मागे घ्या; दादा भुसेंच आवाहन
यादरम्यान दादा भुसे यांनी शेतकऱ्यांना आवाहन केलं आहे. तसेच हा किसान सभेच्या शिष्टमंडळाने लॉन्ग मार्च मागे घ्यावा, असे आवाहन देखिल केलं आहे.
मुंबई : किसान सभेच्या लाँग मार्चचा आजचा (16 मार्च) पाचवा दिवस असून शेतकरी आपल्या मागणीवर ठाम आहेत. तर शेतकऱ्यांचा मार्चा ठाण्यात आहे. आज किसान सभेच्या शिष्टमंडळाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक होणार आहे. यादरम्यान दादा भुसे यांनी शेतकऱ्यांना आवाहन केलं आहे. तसेच हा किसान सभेच्या शिष्टमंडळाने लॉन्ग मार्च मागे घ्यावा, असे आवाहन देखिल केलं आहे. किसान लॉंग मार्च च्या शिष्टमंडळाकडून सगळ्या गोष्टी समजून घेतल्या आहेत. त्यापैकी 40% मागण्या आहेत त्यावर सध्या एकमत झालेला आहे. तर उर्वरित मागण्यांसाठी शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांच्या भेटीला जाणार आहे. त्या मागण्यांवरही सकारात्मक निर्णय घेतला जाईल. शेतकऱ्यांना जो त्रास होतोय त्यावर सरकार सकारात्मक पद्धतीने तोडगा काढण्याचा प्रयत्न करत आहे. किसान सभेच्या शिष्टमंडळाने लॉन्ग मार्च मागे घ्यावा.