संजय राऊत यांच्या चौकशीत तथ्य त्यामुळेच त्यांना अटक झाली – किशोर पाटील
राऊतांची ईडीकडून चौकशी करण्यात आली, त्यामध्ये तथ्य होते त्यामुळेच त्यांना अटक करण्यात आल्याचे किशोर पाटील यांनी म्हटले आहे.
संजय राऊत यांना ईडीने पत्राचाळ प्रकरणात अटक केली आहे. त्यानंतर राज्यातील राजकारण तापले असून, आरोप-प्रत्यारोपाचे राजकारण सुरू झाल्याचे पहायला मिळत आहे. आज उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत मला संजय राऊत यांचा अभिमान वाटत असल्याचे म्हटले. तसेच त्यांनी शिंदे गट आणि भाजपावर देखील जोरदार टीका केली. त्यानंतर या सर्व घटनांवर शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राऊतांची ईडीकडून चौकशी करण्यात आली, त्यामध्ये तथ्य होते त्यामुळेच त्यांना अटक करण्यात आल्याचे किशोर पाटील यांनी म्हटले आहे.
Published on: Aug 01, 2022 07:20 PM