बबली मोठी झाली नाही, बबली नासमझ, पेडनेकरांचा नवनीत राणांना टोला
किशोरी पेडनेकर यांनी पुन्हा एकदा नवनीत राणा यांच्यावर टीका केली आहे. बबली मोठी झाली नाही, बबली नासमझ असल्याचे पेडनेकर यांनी म्हटले आहे.
किशोरी पेडनेकर यांनी पुन्हा एकदा नवनीत राणांना टोला लगावला आहे. बबली मोठी झाली नाही, बबली नासमझ आहे, असे म्हणत त्यांनी नवनीत राणा यांचा समाचार घेतला आहे. जाणून बुजून मुंबईत दंगल सदृष्य परिस्थिती निर्माण केली जात असल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून राणा दाम्पत्य आणि शिवसेनेमध्ये राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू असल्याचे पहायला मिळत आहे. आज बीडमध्ये चंंद्रकांत खैरे यांनी देखील राणा यांच्यावर टीका केली आहे.
Published on: May 08, 2022 06:26 PM