छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीची रणधुमाळी; सतेज पाटील म्हणाले, आमचं ठरलंय!
Kolhapur Chhatrapati Rajaram Sugar Factory : राजाराम सहकारी साखर कारखाना निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस आहे. त्यामुळे आज शक्ती प्रदर्शन करत अर्ज दाखल करण्यात आले. पाहा व्हीडिओ...
कोल्हापूर : कोल्हापुरात निवडणुकीचं वारं वाहतंय. छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याची रणधुमाळी सुरु आहे.
कारखाना निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस आहे. आमदार सतेज पाटील यांनी शक्ती प्रदर्शनासह समर्थकांचं अर्ज दाखल केले आहेत. आमचं ठरलंय आता कंडका पाडायचा!, म्हणत सतेज पाटलांनी महाडिक गटाला थेट आव्हान दिलं आहे. 28 वर्ष छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखाना हुकुमशाही पद्धतीने चालला आहे, असं म्हणत सतेज पाटील यांचा माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्यावर घणाघात केलाय.
Published on: Mar 27, 2023 03:20 PM