चौकशीचा फेऱ्यात अध्यक्षांनी गोकुळची साथ सोडली? म्होरक्यांनी काय केलं? काटेरी मुकूट कोणाच्या डोक्यावर?
याचदरम्यान येथे म्होरक्यांनी गोकुळमध्ये खांदेपालट करण्याचे ठरवत अध्यक्षपदी जेष्ठ संचालक अरूण डोंगळे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केला आहे. तर विद्यमान अध्यक्ष विश्वास पाटील यांनी संचालक मंडळाच्या बैठकीत राजीनामा दिला होता.
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक (गोकुळ) संघ सध्या लेखापरीक्षण चाचणी अडकलं आहे. याचदरम्यान येथे म्होरक्यांनी गोकुळमध्ये खांदेपालट करण्याचे ठरवत अध्यक्षपदी जेष्ठ संचालक अरूण डोंगळे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केला आहे. तर विद्यमान अध्यक्ष विश्वास पाटील यांनी संचालक मंडळाच्या बैठकीत राजीनामा दिला होता. हा राजीनामा स्वीकारण्यात आला आहे. दोन वर्षांपुर्वी विद्यमान अध्यक्ष विश्वास पाटील यांची दुध महासंघाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती. त्यांच्या अध्यक्ष पदाचा कार्यकाळ संपल्याने डोंगळे यांना अध्यक्षपदी बसवण्यात येणार आहे. त्यांच्याकडे 25 तारखेला पदभार जाण्याची शक्यता आहे. तर अरुण डोंगळे यांच्या नावावर आमदार सतेज पाटील, आमदार विनय कोरे, आमदार हसन मुश्रीफ, खासदार संजय मंडलिक यांच्यामध्ये झालेल्या बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आला.