Kolhapur | Satej Patil यांच्यावर शौमिका महाडीक यांचा आरोप-tv9

| Updated on: Aug 19, 2022 | 10:09 AM

गोकूळची वार्षीक सर्वसाधारण सभा हे बावड्यातील महासैनिक दरबार हॉल येथे घेण्यात येणार आहे. त्यावरूनच संचालक शौमिका महाडीक यांनी आमदार सतेज पाटलांवर निशाना साधला आहे.

कोल्हापूर जिल्ह्याचे राजकारण हे गोकूळ भोवती फिरणारे आहे. त्यामुळे यावर आपलीच सत्ता असावी म्हणून महादेव महाडीक, पी. एन पाटील, सतेज पाीटल, हसन मुश्रीफ यांच्यासह जिल्ह्यातील मात्तबार नेते प्रयत्न करत असतात. एकदा आमदारकी नको पण गोकूळचे संचालक पद हवे, असे हे गोकूळ आहे. आता याच गोकूळवरून पुन्हा एकदा संघर्षाची ठिणगी जिल्ह्यात पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. गोकूळची वार्षीक सर्वसाधारण सभा हे बावड्यातील महासैनिक दरबार हॉल येथे घेण्यात येणार आहे. त्यावरूनच संचालक शौमिका महाडीक यांनी आमदार सतेज पाटलांवर निशाना साधला आहे. तसेच शौमिका महाडीक यांनी पाटलांवर आरोप करताना, सभासदांवर दबाव आणण्यासाठीच कसबा बावडा परिसरात सभा घेतली जात असल्याचे म्हटलं आहे. कसबा बावडा हा आमदार सतेज पाटील यांचा बालेकिल्ला मानला जातो.

 

Published on: Aug 19, 2022 10:09 AM
Krishna Janmashtami | देशभरात गोकुळाष्टमी आणि दहीहंडीचा उत्साह-tv9
Manish Sisodia: दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या घरी सीबीआयची छापेमारी