आधी ईडीचं समन्स आता ‘तो’ तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग; आमदार हसन मुश्रीफ यांच्या अडचणीत वाढ

| Updated on: Mar 23, 2023 | 2:46 PM

MLA Hasan Mushrif : आमदार हसन मुश्रीफ यांच्या विरोधातील दाखल 420 गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे. त्यामुळे त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. पाहा...

कोल्हापूर : आमदार हसन मुश्रीफ यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. त्यांच्या विरोधातील दाखल 420 गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे. मुरगुड पोलीस ठाण्यात विवेक कुलकर्णी यांनी दिलेल्या तक्रारीवरून आमदार मुश्रीफ यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल झालाय. सरसेनापती संताजी घोरपडे कारखान्यातील गुंतवणूकदारांनी तक्रार केली होती. तक्रारदारांची संख्या वाढत असल्याने गुन्हा आर्थिक शाखेकडे वर्ग करण्यात आली आहे. त्यामुळे मुश्रीफ यांच्या अडचणीत वाढ झालीये. हसन मुश्रीफ यांना ईडीने पुन्हा एकदा समन्स बजावला आहे. 24 मार्च म्हणजे उद्या पुढील चौकशीसाठी हजर राहण्याचे निर्देशही दिले आहेत.

Published on: Mar 23, 2023 02:46 PM
मराठी भाषा भवनावरून उद्धव ठाकरेंची टीका, एक विटही…
भाजप घाबरलंय, त्यामुळे राहुल गांधींवर कारवाई; नाना पटोले यांचं टीकास्त्र