चौकशीला हजर राहण्याचं ईडीचं समन्स; आमदार हसन मुश्रीफ हजर राहणार की नाही? पाहा…

| Updated on: Mar 13, 2023 | 10:00 AM

MLA Hasan Mushrif ED Inquiry : राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ यांच्याविरोधात ईडीची चौकशी सुरू आहे. मुश्रीफ यांना आज चौकशीला हजर राहण्याचं ईडीचं समन्स आहे. मुश्रीफ आजच्या कारवाईला हजर राहणार का? पाहा...

कोल्हापूर : कोल्हापूरमधील कागलचे, राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ यांच्याविरोधात ईडीची चौकशी सुरू आहे. मुश्रीफ यांना आज चौकशीला हजर राहण्याचं ईडीचं समन्स आहे. मात्र ईडी करावाईच्या दोन दिवसानंतरही आमदार हसन मुश्रीफ संपर्काबाहेर आहेत. त्यामुळे हसन मुश्रीफ आज ईडी कार्यालयात हजर राहणार नसल्याची माहिती आहे. खात्रीलायक सूत्रांनी माहिती दिली आहे. त्यामुळे मुश्रीफ आपली बाजू वकीलांमार्फत मांडतात का हे पाहणं महत्वाचं असेल. मुश्रीफ यांच्या कागलमधील घरावर दोन दिवसाआधी ईडीची कारवाई झाली. ही कारवाई सुरू असताना मुश्रीफ यांच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली होती.

Published on: Mar 13, 2023 10:00 AM
जयंत पाटीलांचा वाढदिवस आणि थरार बैलगाडा शर्यतीचा
दादा भुसे यांच्या चर्चा पण तोडगा नाही; शेतकरी-कष्टकऱ्यांचा लाँगमार्च मुंबईकडे रवाना होणार