आम्हाला गोळ्या घालून जा…; हसन मुश्रीफ यांच्या पत्नीच्या डोळ्यात पाणी
राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांच्या घरावर आज पुन्हा एकदा ईडीची धाड पडली आहे. यानंतर हसन मुश्रीफ यांच्या पत्नी सायरा यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्यांच्या डोळ्यात अश्रू होते.
कागल, कोल्हापूर : कोल्हापुरात ईडीची कारवाई सुरू आहे. माजी मंत्री, राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांच्या घरावर आज पुन्हा एकदा ईडीची धाड पडली आहे. मागच्या दीड महिन्यात दुसऱ्यांदा मुश्रीफ यांच्या विरोधात ही कारवाई करण्यात आली आहे. आज पहाटेच्या सुमारास ईडीचे चार ते पाच अधिकारी हसन मुश्रीफ यांच्या घरी दाखल झाले आणि त्यांनी चौकशीला सुरूवात केली. यावेळी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मुश्रीफ यांच्या घराजवळ जमले आहेत. यानंतर सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. हसन मुश्रीफ यांच्या पत्नी सायरा यांनी आक्रमक कार्यकर्त्यांशी संवाद साधला. “तुम्ही सगळे शांत राहा. ईडीच्या अधिकाऱ्यांना सांगा आम्हाला गोळ्या घालून जा”, अशी प्रतिक्रिया सायरा मुश्रीफ यांनी दिली आहै. यावेळी सायरा यांच्या डोळ्यात पाणी होतं.
Published on: Mar 11, 2023 10:24 AM