मुश्रीफ यांच्या पत्नीच्या डोळ्यात पाणी, त्यांच्या केसाला जरी धक्का लागला…; राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक

| Updated on: Mar 11, 2023 | 10:04 AM

हसन मुश्रीफ यांच्या घरावर आज पुन्हा एकदा ईडीची धाड पडली आहे. मागच्या दीड महिन्यात दुसऱ्यांदा ही कारवाई करण्यात आली आहे. हसन मुश्रीफ यांच्या घराबाहेर सध्या कार्यकर्त्यांची गर्दी जमली आहे. राष्ट्रवादीच्या महिला नेत्या आक्रमक झाल्या आहेत. पाहा...

कागल, कोल्हापूर : माजी मंत्री, राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांच्या घरावर आज पुन्हा एकदा ईडीची धाड पडली आहे. मागच्या दीड महिन्यात दुसऱ्यांदा ही कारवाई करण्यात आली आहे. आज पहाटेच्या सुमारास ईडीचे चार ते पाच अधिकारी हसन मुश्रीफ यांच्या घरी दाखल झाले. त्यानंतर मुश्रीफ यांच्या घरी आता चौकशी केली जात आहे. हसन मुश्रीफ यांच्या घराबाहेर सध्या कार्यकर्त्यांची गर्दी जमली आहे. यावेळी राष्ट्रवादीच्या महिला नेत्या आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. “घरात केवळ महिला आणि लहान मुलं असताना ईडीने ही कारवाई केली आहे. यांच्यापेक्षा जनावरं बरी. हसन मुश्रीफ यांच्या पत्नीच्या डोळ्यात पाणी आहे. त्यांच्या केसाला जरी धक्का लागला तर आम्ही खपवून घेणार नाही. घरातील लहान मुलांना ताप आलाय. असं असताना निर्दयीपणे ही कारवाई केली जातेय”, असं म्हणत राष्ट्रवादीच्या कोल्हापूर महिला अध्यक्षा, फराकटेवाडीच्या सरपंच शीतल फराकटे यांनी ईडीच्या कारवाईवर आक्रमक प्रतिक्रिया दिली आहे.

Published on: Mar 11, 2023 09:57 AM
‘ईडीची धाड धक्कादायक’- जयंत पाटील
आम्हाला गोळ्या घालून जा…; हसन मुश्रीफ यांच्या पत्नीच्या डोळ्यात पाणी