Video | चंद्रहार, म्हाळुंग, बोरमाळ, सोनकिरीट, मासोळी… नवरात्र आलंय… कोल्हापूर अंबाबाईच्या दागिन्यांची सफाई पहा…

| Updated on: Sep 23, 2022 | 4:01 PM

आज झालेल्या स्वच्छतेमुळे देवीच्या दागिन्यांना नवी झळाळी मिळाली आहे. देवीच्या प्राचीन दागिन्यांच्या सफाईच्या निमित्ताने या जुन्या धाटणीच्या दागिन्यांची चर्चा होतेय. 

भूषण पाटील, कोल्हापूर- सोमवारपासून नवरात्राला (Navrahtri) सुरुवात होतेय. कोल्हापूरच्या (Kolhapur) करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरात नवरात्रोत्सवाची तयारी अंतिम टप्यात आली आहे.. त्याचाच भाग म्हणून आज देवीच्या सोन्याच्या दागिन्यांची (Golden Jewelry ) स्वच्छता करण्यात आली. दोन दिवसांपूर्वी मुख्य गर्भगृहात स्वच्छता करण्यात आली. आज देवीला दररोज घातल्या जाणाऱ्या दागिन्यांसह तिच्या खजिन्यातल्या खास दागिन्यांची देखील स्वच्छता करण्यात आली. यामध्ये शिवकालीन कवड्याची माळ, 16 पदरी चंद्रहार,सोन्याची पालखी,म्हाळुंग, बोरमाळ, कवड्याची माळ, पुतळ्याची माळ, ठुशी, कुंडल,सोन किरीट, बोरमाळ,कर्णफुले, मासोळी, चाफेकळी हार; कोल्हापुरी साज, मंगळसुत्र, 116 पुतळ्याची माळ, लप्पा, सात पदरी कंठी याचा आशा एक ना अनेक दागिन्यांचा समावेश आहे…आज झालेल्या स्वच्छतेमुळे देवीच्या दागिन्यांना नवी झळाळी मिळाली आहे. देवीच्या प्राचीन दागिन्यांच्या सफाईच्या निमित्ताने या जुन्या धाटणीच्या दागिन्यांची चर्चा होतेय.

Published on: Sep 23, 2022 03:42 PM
बारामतीच नाही, महाराष्ट्रात 48 टार्गेट, कोल्हापुरातून भाजप नेत्याचं वक्तव्य!
Video : खैरेंकडून बावनकुळेंची नक्कल… सूर्यासमोर दिवा… वर काय म्हणाले?