नृहसिंहवाडीतील दत्त मंदिरात 5 दिवसांपासून गुडघाभर पाणी, पंचगंगेची पातळी 47 फूटांवर

| Updated on: Jul 27, 2024 | 3:51 PM

कोल्हापूरात कृष्णा आणि पंचगंगेच्या पुराने जनजीवन विस्कळीत झाले आहे. शिरोळ तालुक्यातील नृहसिंहवाडीतील प्रसिद्ध दत्त मंदिरात गुडघाभर पाणी साचले आहे. साल 2021 मध्ये पावसाने झालेल्या पुरात देखील येथील व्यापाऱ्याचे मोठे नुकसान झाले होते.

Follow us on

कोल्हापूरात कोयना आणि राधानगरीतील धरणातील पाणी सोडल्याने कृष्णा आणि पंचगंगेला मोठा पुर आला आहे. त्यामुळे इंचलकरंजीतील नृहसिंहवाडीतील प्रसिद्ध दत्त मंदिरात गु़डघाभर पाणी साचले आहे. गेले पाच दिवसांपासून पाणी साचल्याने येथील दुकानदारांना तसेच रहिवाशांना हलविण्यात आले आहे. साल 2019, 2021, आणि 2005 मध्ये देखील येथील दत्त मंदिराचा परिसर पुरात बुडाला होता. शिरोळ तालुक्यातील कृष्णा आणि पंचगंगा नदीच्या संगमावर वसलेल्या नृसिंहवाडीतील दत्त मंदिरात नेहमीच पुराचे पाणी भरत असते. साल 2021 मध्ये देखील येथील व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. गेले पाच दिवस येथे मोठा पाऊस झाल्याने कोयना आणि राधानगरी धरणातील पाणी सोडून देण्यात आल्याने येथील पेड्यातील बाजारपेठेत गुडघाभर पाणी साचले असून त्यातून भाविक मार्गक्रमण करीत आहेत. कोल्हापूरात आता पावसाने उघडीप दिली आहे. जर पाऊस असाच थांबला तरच नागरिकांना दिलासा मिळणार आहे. पंचगंगा नदीची पातळी 47 फूट 5 इंचावर गेली आहे. पाऊस थांबला असला तरी पाणी पातळी वाढत आहे. राधानगरी धरणातून असाच विसर्ग सुरु राहीला आणि पाऊस पुन्हा पडला तर मात्र परिस्थिती बिकट होणार आहे. कसबा बावडा रोड दसरा चौक पुणे – बंगलोर महामार्गाकडे जाणारा प्रमुख मार्गच बंद केल्याने वाहतूकीचा खोळंबा झालेला आहे.