Video : माझ्याकडून ‘तो’ शब्द चुकलाच; अमोल कोल्हे यांच्याकडून जाहीर दिलगिरी व्यक्त

| Updated on: Mar 04, 2023 | 9:22 AM

राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी आपल्या वक्तव्या प्रकरणी दिलगिरी व्यक्त केली आहे. बेळगावी असा उल्लेख केल्या प्रकरणी अमोल कोल्हे यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. पाहा...

कोल्हापूर : राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी आपल्या वक्तव्याप्रकरणी दिलगिरी व्यक्त केली आहे. बेळगावी असा उल्लेख केल्या प्रकरणी अमोल कोल्हे यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. घाई गडबडीत आणि अनावधानानं बेळगावचा बेळगावी असा उल्लेख केला, असा खुलासा अमोल कोल्हे यांनी केला आहे. एका नियोजित कार्यक्रमात संदर्भात प्रतिक्रिया देताना अमोल कोल्हे यांनी बेळगावी असा उल्लेख केला होता. बेळगावी उल्लेखावरून महाराष्ट्र एकीकरण समितीने खासदार अमोल कोल्हेंवर टीकेची झोड उठवली होती. महाराष्ट्र एकीकरण समिती आणि सीमा भागातील संतप्त प्रतिक्रियांनंतर खासदार कोल्हे यांनी आता दिलगिरी व्यक्त केली आहे.

Published on: Mar 04, 2023 07:59 AM
समृद्धी महामार्गावर केमिकलने भरलेल्या ट्रकचा भीषण अपघात, ट्रकमधील सर्वप्रवाशांच्या जागीच मृत्यू
Video : राज्यात लवकरच ‘इतक्या’ जागांसाठी मोठी शिक्षक भरती