उद्धवजी, फक्त इशारे देऊ नका, सावरकरांच्या विरोधात बोलणाऱ्या काँग्रेसपासून दूर जाऊन उत्तर द्या; शिवसेना नेत्याचं आव्हान

| Updated on: Apr 05, 2023 | 3:00 PM

काँग्रेसचा संदर्भ देत शिवसेना नेत्याचं उद्धव ठाकरेंना आव्हान; बाळासाहेब ठाकरे आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विचाराांचाही दाखल दिला. पाहा व्हीडिओ...

कोल्हापूर : शिवसेनेचे वरिष्ठ नेते आणि मंत्री दीपक केसरकर यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. फक्त स्टेजवरून इशारे न देता सावरकरांविरोधात बोलणाऱ्या काँग्रेसपासून दूर जाऊन उत्तर द्यावं, एवढीच अपेक्षा आहे, असं केसरकर म्हणाले आहेत. अजूनही वेळ गेलेली नाही. उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यासाठी, स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराबरोबर यावं, असंही ते म्हणाले आहेत. जोतिबाचा आशीर्वाद कायमच कोल्हापूरवर राहिलेला आहे. जोतिबाच्या पालखीची पूजा करून पंचगंगा नदी शुद्धीकरण बैठकीला उपस्थित राहणार आहे. कोल्हापूरला आंतरराष्ट्रीय पर्यटन नगरी बनवायचं आहे. त्यासाठी सरकारही प्रयत्नशील आहे, असं दीपक केसरकर म्हणाले आहेत.

Published on: Apr 05, 2023 02:58 PM
माफी मागा अन्यथा…; रिक्षा चालकांचा अरविंद सावंत यांना इशारा
सावरकरांच्या अपमानाचा बदला घेतल्याशिवाय स्वस्त बसणार नाही; एकनाथ शिंदेंचा इशारा