…तर आपण बारसूत जाऊया आणि शेतकऱ्यांना वाचवूयात; राजू शेट्टी आक्रमक

| Updated on: Apr 28, 2023 | 3:13 PM

Barsu Farmer Andolan : अश्रूधुराचा वापर करत बारसुतील आंदोलकांना पोलिसांनी हटवलं; राजू शेट्टी आक्रमक; म्हणाले...

कोल्हापूर : रत्नागिरीतील बारसूमध्ये रिफायनरी प्रकल्पाला विरोध करण्यासाठी स्थानिकांकडून आंदोलन केलं जात आहे. अश्रूधुराचा वापर करत पोलिसांनी आंदोलकांना हटवलं आहे.  स्वाभिमानीचे नेते राजू शेट्टी यांनी बारसूमधील आंदोलनावर प्रतिक्रिया दिली आहे. बारसूमध्ये पोलिसांनी केलेल्या दडपशाहीचा मी तीव्र शब्दात निषेध करतो, असं ते म्हणालेत. शेतकऱ्यांवर बेशुद्ध होईपर्यंत लाठीचार्ज केलाय. लोकशाहीच्या राज्यात आंदोलकांना बेशुद्ध होईपर्यंत मारणार असाल तर शरम वाटली पाहिजे. आंदोलन मोडीत काढण्याचा प्रयत्न करत असाल तर मी तमाम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आवाहन करतो, आपण रत्नागिरीला जाऊ आणि बारसूमधल्या शेतकऱ्यांना वाचवू. बघू यांच्याकडे गोळ्या किती आहेत. लाठ्या किती आहेत आणि पोलीस किती आहेत ते, असंही राजू शेट्टी म्हणालेत. सरकारनं आता शेतकऱ्यांशी दोन हात करण्याची तयारी सरकारने दाखवावी, असंही ते म्हणालेत.

Published on: Apr 28, 2023 03:13 PM
दरे गावात जायला सरळ रस्ता नाही, मात्र मुख्यमंत्र्यांच्या शेतावर हेलिपॅड; अंधारे यांचा शिंदे यांना सवाल
अवकाळीचा बाजार समितीच्या मतदानाला फटका, केंद्रांवर शुकशुकाट अन्…