29 उमेदवारांचं अपील फेटाळलं; आता पुढची भूमिका काय? सतेज पाटील यांनी सांगितलं…

| Updated on: Apr 10, 2023 | 1:51 PM

Chhatrapati Rajaram Cooperative Sugar Factory Election 2023 : महाडिक भ्याले आहेत हे कोल्हापूरकरांनी पाहिलं आहे. हा कारखाना खासगी होऊ नये यासाठी लढाई आहे, असं काँग्रेस नेते सतेज पाटील म्हणाले आहेत.

कोल्हापूर : कोल्हापूरच्या छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखाना निवडणुकीत काँग्रेसचे वरिष्ठ नेते, आमदार सतेज पाटील यांना मोठा धक्का बसला आहे. सतेज पाटील गटाच्या 29 उमेदवारांचं अपील फेटाळण्यात आलं आहे. त्यावर सतेज पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “29 उमेदवारांच्या बाबतीत अपिल केल्यानंतर तातडीने निकाल द्या, असं सांगितलं होतं. पण भाजपने अधिकाऱ्यांवर दबाव टाकला. काल सुट्टी असताना देखील रात्री 12 वाजता निकाल देण्यात आला. 29 उमेदवार ठेवून लढाई करण्याचं धाडस महाडिक यांच्यात नाही”, असं सतेज पाटील म्हणाले आहेत. 29 उमेदवारांना बाजूला केलं असलं तरी लढाई 50 जणाबरोबर आहेत. काही उमेदवार या कचाट्यातून सुटू नये, असा निर्णय घेण्यात आला. हा निर्णय आता राजाराम कारखान्यापुरता मर्यादित राहणार नाही. या निर्णयाविरोधात आम्ही हायकोर्टात जाणार आहोत, असं सतेज पाटील म्हणाले आहेत.

Published on: Apr 10, 2023 01:50 PM
देवेंद्रजी, तुमच्यामुळे अमरावतीचा विकास , पण आता मेळघाटासाठी एवढं एक काम करा; नवनीत राणा यांची मागणी
जगदीश मुळीक यांच्यानंतर राष्ट्रवादीच्या ‘या’ नेत्याचा भावी खासदार म्हणून उल्लेख