आप्पासाहेब धर्माधिकारी यांचा शब्द डावलून गर्दी जमवली गेली; सुषमा अंधारे यांचा सरकारवर आरोप
Sushma Andhare on Maharahstra Bhushan Award 2022 : महाराष्ट्र भूषण पुरस्कार वितरण सोहळ्यातील श्रीसेवकांचा मृत्यू प्रकरणी सुषमा अंधारे यांचे सरकारवर आरोप. म्हणाल्या...
कोल्हापूर : यंदाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी देण्यात आला. या पुरस्कार वितरण सोहळ्या श्रीसेवकांचा मृत्यू झाला. यावर शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आप्पासाहेबांनी साधेपणाने कार्यक्रम करावा, अशा सूचना केल्या असतील. मात्र त्यांनी दिलेली वेळ घेतली म्हणत त्यांच्याबद्दल भाजप चुकीची माहिती देत आहे. या सगळ्यात मृतांचा आकडा लपवला गेला आहे. 100 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला असावा, असं सुषमा अंधारे म्हणाल्या आहेत. 16 कोटी खर्च करता तर अजून थोडे पैसे खर्च करून पेंडाल का उभं केलं नाही? आरोग्य विभागाला अगदी शेवटच्या वेळी कार्यक्रमाची का कल्पना दिली गेली. स्वतंत्र रुग्णवाहिकेचा मार्ग केला नाही. अनुयायांना मतदार समजून मतावर डोळा ठेवत कार्यक्रम घेतला गेला, असं सुषमा अंधारे म्हणाल्या आहेत.
Published on: Apr 19, 2023 01:45 PM