तुम्ही रक्ताची भाषा करणार असाल तर आमच्याकडूनही रक्ताची भाषा होईल!; नितेश राणे यांचं कुणाला आव्हान?

| Updated on: Mar 25, 2023 | 10:37 AM

Nitesh Rane : लव्ह जिहादविरोधी कायद्याची मागणी नितेश राणे यांनी केली आहे. तसंच जितेंद्र आव्हाड अन् अबू आझमी यांच्यावरही त्यांनी टीका केली आहे. पाहा नितेश राणे काय म्हणालेत.

कोल्हापूर : भाजपचे नेते नितेश राणे यांनी लव्ह जिहादविरोधी कायद्याची मागणी केली आहे. “लव्ह जिहादविरोधात कायद्याची मागणी आम्ही करतोय. सामान्य लोकांना देखील याची माहिती व्हावी यासाठी व्याख्यान आणि प्रबोधनातून प्रयत्न केला जातोय. मुंब्र्याचा जितूद्दीन आणि अबू आझमी लव्ह जिहादची आकडेवारी खोटे असल्याचा दावा करत आहेत. हे चूक आहे”, असं नितेश राणे म्हणाले. नामांतरावरून सध्या वाद सुरू आहे. यावर ही नितेश राणे बोललेत. औरंगाबादचे नाव बदलल्यानंतर स्टेटसच्या माध्यमातून वेगळा रंग देण्याचा प्रयत्न होतोय. तुम्ही रक्ताची भाषा करणार असाल तर आमच्याकडूनही रक्ताची भाषा होईल, असा इशारा नितेश राणे यांनी दिला आहे.

Published on: Mar 25, 2023 10:37 AM
कृष्णा नदी प्रदुषणाविरोधात सांगलीकरांचा एकसंघतेचा हुंकार
सांगलीकरांचं अभिनंदन, सरकारला सल्ला; राजू शेट्टी नेमकं काय म्हणाले?