राहुल गांधी यांच्यावर कसाबप्रमाणे देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा; कुणी केली मागणी?

| Updated on: Mar 25, 2023 | 9:32 AM

Rahul Gandhi Disqualified : राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आली. यावर आता संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत.परदेशात जाऊन देशाची बदनामी करणाऱ्या राहुल गांधी यांच्यावर कसाब प्रमाणे देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा, अशी मागणीही करण्यात आली आहे. पाहा...

कोल्हापूर : सूरत सत्र न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा सुनावल्यानंतर राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आली. यावर आता संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. भाजपकडून राहुल गांधी यांच्यावर जोरदार हल्लाबोल करण्यात येत आहे. भाजपचे नेते नितेश राणे यांनीही राहुल गांधी यांच्यावर जोरदार टीका केलीय. ओबीसींच्या नावाने चुकीचं बोलता, आक्षेपार्ह वक्तव्य करता. मग संसदीय पद्धतीने कारवाई झाल्यावर भाजपच्या नावाने का बोंबलता?, असं नितेश राणे म्हणाले आहेत. परदेशात जाऊन देशाची बदनामी करणाऱ्या राहुल गांधी यांच्यावर कसाब प्रमाणे देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा. राहुल गांधींना पाकिस्तानात पाठवा, असंही नितेश राणे म्हणाले आहेत.

Published on: Mar 25, 2023 07:58 AM
शिंदे हे नरेंद्र मोदींच्या विचारांचे वारसदार जास्त, राष्ट्रवादीची टीका
राहुल गांधी यांच्यावरून ‘सामना’च्या अग्रलेखातून केंद्र सरकारवर टीका