कोल्हापूर उत्तर पोटनिवडणुकीत पैशाचा पाऊस
गेल्या अनेक दिवसांपासून भाजप विरुद्ध महाविकास आघाडी सामना कोल्हापुरात रंगला आहे. उद्या या जागेसाठी मतदान होणार आहे. अशामध्ये हे प्रकरण समोर आल्याने खळबळ माजली आहे.
कोल्हापूर उत्तर विधानसभा मंतदार संघाचा प्रचार सध्या अंतिम टप्प्यात आला आहे. अशातच आता निवडणुकीत मोठ्या प्रमाणात पैशाचा वापर होत असल्याची घटना घडली आहे.भाजपाच्या माजी नगरसेविकेच्या कार्यालयात पैशाची पाकीटं सापडल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी भाजपाच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे. उद्या होणार्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर पैसे वाटप करत असल्याचा आरोप या कार्यकर्त्यांवर करण्यात आला आहे. याप्रकरणी चौकशी सुरू असून गुन्हा दाखल झाला नाही. अशी माहिती समोर आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून भाजप विरुद्ध महाविकास आघाडी सामना कोल्हापुरात रंगला आहे. उद्या या जागेसाठी मतदान होणार आहे. अशामध्ये हे प्रकरण समोर आल्याने खळबळ माजली आहे. पोलीस तपासात काय माहिती समोर येते हेही पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे.