कोल्हापुरात सलग चौथ्या दिवशी पावसाचा जोर कायम, पंचगंगेच्या पाणी पातळीत वाढ
Kolhapur Rain Update: कोल्हापूर जिल्ह्यात सलग चौथ्या दिवशी परतीचा पावसाचा जोर कायम आहे.
कोल्हापूर : कोल्हापूर (Kolhapur Rain Update) जिल्ह्यात सलग चौथ्या दिवशी परतीचा पावसाचा जोर कायम आहे. पंचगंगासह (Panchganga River) सर्वच नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. पंचगंगा नदीच पाणी पात्राबाहेर पडायला सुरुवात झाली आहे. नदीची पाणीपातळी पोचली 29 फूट तीन इंचावर पोहोचली आहे. राधानगरी धरणाच्या 3 स्वयंचलित दरवाजातून भोगावती नदीत विसर्ग सुरु करण्यात आला आहे. नदीच्या पाणी पातळी आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. सध्या कोल्हापूर शहर परिसरात पावसाने उसंत घेतली आहे. मात्र धरण क्षेत्रात संततधार कायम आहे.
Published on: Sep 13, 2022 11:28 AM